
मराठी कलासृष्टी अगदी छोटी आहे. इथे दररोज कुणीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी येतं. मराठी मालिका हा प्रेक्षकांच्या घरात पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. मालिकांमधून मिळालेली लोकप्रियता ही प्रचंड मोठी असते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपलं काम पोहोचतं. आणि प्रेक्षकही मालिकेतील कलाकारांना लक्षात ठेवतात तेही मालिकांच्या नावासहीत. आता अशीच एक मराठी अभिनेत्री प्रेक्षकांचं मन जिंकायला पुन्हा सज्ज झालीये. ती तेजश्री प्रधानच्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत झळकणार आहे.