

Marathi Entertainment News : तब्बल १५ वर्षानंतर छोट्या पडद्यावरची सासु-सुनेची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुढचं पाऊल’ या गाजलेल्या मालिकेतील शिस्तप्रिय आणि खाष्ट सासू हर्षदा खानविलकर तिच्या ऑनस्क्रीन कट कारस्थानी सुनेसोबत म्हणजेच शर्मिला राजाराम शिंदेसोबत रंगमंचावर पुन्हा एकदा एन्ट्री घेत आहे. या ऑनस्क्रीन सासु-सुनेची जुगलबंदी पुन्हा एकदा सासू सूनेच्याच भूमिकांमध्ये ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.