
anandi joshi
esakal
सध्याच्या जगात हातात आलेल्या स्मार्टफोनमुळे जग जवळ आलंय. कित्येक जण त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र याच फोटो आणि व्हिडिओंवर अनेकदा आक्षेपार्ह भाषेत कमेंट केलेल्या दिसतात. आपण इथे कुणालाही काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतं. स्वतःच्या मनातली गरळ ओकायचं हे एक योग्य ठिकाण आहे असं काही जणांना वाटतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर काहीही परिणाम झाला तरी त्याचा त्यांना काहीही फरक पडत नाही. हे कलाकारांसोबत जास्त घडताना दिसतं. मराठी गायिकेलादेखील अशाच एका धक्कादायक घटनेला सामोरं जावं लागलंय. एका व्यक्तीने तिच्याबद्दलचाच मेसेज मित्राला पाठवायचा सोडून चुकून गायिकेलाच सेंड केला. आणि हा व्यक्ती एक डॉक्टर आहे.