

Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणारा लोकप्रिय मराठी फिल्म फेस्टिव्हल यंदा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे. रेड एफएम आयोजित या महोत्सवाचे ६वे पर्व २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पार पडणार असून, मराठी सिनेमाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. हा महोत्सव पुण्यातील ई-स्क्वेअर, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.