पुणे - मिलन राठोड या पुणेकर तरुणाने तयार केलेल्या ‘वुंग वुंग’ या लघुपटाला जगभरातून दाद मिळाली आहे. आपल्या मित्रांच्या मदतीने मिलनने तयार केलेल्या या लघुपटाला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये तब्बल १४ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच अनेक महोत्सवांमध्ये विशेष प्रदर्शन झाले आहे. नुकताच हा लघुपट ‘हमारा मूव्ही’ या यूट्यूबवरील लघुपटांच्या व्यासपीठावरही प्रदर्शित झाला आहे.