

PUNHA SHIVAJIRAJE BHOSALE MOVIE REVIEW
ESAKAL
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत विषय आहे. आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे, कर्जाच्या ओझ्यामुळे किंवा अन्य काही कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ आणि त्यातच कधी चांगले उत्पन्न आले तर भ्रष्ट व्यवस्थेमुळे मालाला मिळणारा कमी भाव. त्यामुळे आपला हा अन्नदाता आजही दुःखी आहे आणि त्यामुळे तो कधी कधी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. 'पुन्हा शिवाजीराजे भोंसले' हा मराठी चित्रपट या संवेदनशील आणि गंभीर विषयाबरोबरच मराठी अस्मिता, बोकाळलेला भ्रष्टाचार वगैरे बाबींवर परखडपणे आणि जळजळीत प्रहार करणारा आहे.