
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये पुर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय. प्रकृती बिघडल्याने गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील का खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ३-४ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर कुणाचाही विश्वास बसेनासा झालाय. त्यात 'ठरलं तर मग' च्या चाहत्यांनी देखील त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.