

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'शिवा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने चाहत्यांसोबत एक वाईट बातमी शेअर केलीये. पूर्वाच्या सासूबाईंचं निधन झालंय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही बातमी शेअर केलीये. सासूबाईंच्या निधनाने पूर्वा कोसळून गेलीये. तिच्या पोस्टमधून तिच्या आणि सासूमधील नातं किती छान होतं याचा अंदाज येतोय. तिची पोस्ट वाचुन नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी उभं राहिलंय.