अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 रिलीज होऊन अवघा एकच महिना झाला आहे. आजही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाबाबत क्रेझ कायम आहे. अनेक चित्रपटगृहात हा चित्रपट हाऊसफुल्ल आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. 31 व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने तब्बल 1200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतात एवढी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.