R MADHAVAN NEW LOOK VIRAL
esakal
R MADHAVAN MESSY HAIR AND LONG BEARD: धुरंधर सिनेमानंतर चर्चेत आलेला अभिनेता आर माधवन याची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळते. तो नेहमीच त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याचे दैनंदिन अपडेट चाहत्यांना देत असतो. अशातच आता त्याच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलय. त्याचा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, 'आर. माधवन'ला नक्की काय झालंय?