

radha patil and gautmi patil
esakal
लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि नृत्यांगना राधा मुंबईकर या दोघीही महाराष्ट्रातील आघाडीच्या डान्सर आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागतं. मात्र या दोघींची लोकप्रियता जितकी जास्त आहे तितकंच त्यांच्यातील वैर चर्चेत आहे. राधा आणि गौतमी यांच्यातील वादाची एक घटना प्रचंड गाजली होती. जेव्हा राधाला पाहून गौतमीने स्टेज सोडला होता आणि आयोजकांशी भांडली होती. तेव्हा नेमकं काय घडलेलं हे राधाने एका पॉडकास्टमध्ये सांगितलंय.