

Rahul Deshpande Collective Dombivli
esakal
Marathi Entertainment News : शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या दमदार, भावस्पर्शी आणि तितक्याच तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण गायकीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
शास्त्रीय बंदिशी असोत, नाट्यसंगीताची रंगत असो किंवा भावगीतांची कोमलत, त्यांच्या सादरीकरणात नेहमीच सुरेलपणा, नेमकी लय आणि हृदयाला भिडणारी अभिव्यक्ती अनुभवायला मिळते. ‘कट्यार काळजात घुसली’मधील गाणी, ‘घेई छंद मकरंद’, ‘सूर निरागस हो’, ‘रंग रंगीला श्याम’ यांसारख्या रचना त्यांनी रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून ठेवल्या आहेत.