Rahul Solapurkar: राहुल सोलापूरकरांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी! शिवरायांबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान

एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना आपली भूमिका सविस्तरपणए मांडली.
actor rahul solapurkar
actor rahul solapurkar
Updated on

Rahul Solapurkar Expresses Regret : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अखेर माफी मागितली आहे. आपला शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. फक्त आपण इतिहास कशा रंजक पद्धतीनं सांगितला जातो, एवढचं माझा सांगण्याचा प्रयत्न होता. पण यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना आपली भूमिका सविस्तरपणए मांडली.

actor rahul solapurkar
Shivaji Maharaj: राहुल सोलापूरकरांचे शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले? REAL STORY काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com