
Valentine Day 2025: रोज डे, प्रॅामिस डे किंवा किस डे असो हे सारेच दिवस खुप क्युट आहेत. पण, खरे म्हणावे तर मी दिवस बघून प्रेम करत नाही. त्यामुळे माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे आहे, अशी भावना मूळचा नागपूरकर असणारा प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याने व्यक्त केली.
एका दिवसाची वाट बघून प्रेम सेलिब्रेट करणे हे योग्य नाही. व्हॅलेंटाइनला आम्ही विशेष काही करत नाही. पण आमची कन्या झाल्याने सध्या अख्खे विश्वच तिच्या अवतीभवती असते, असेही तो म्हणाला.