

अजय देवगन चा 'रेड' चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता 'रेड २' १ मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अशातच, नुकताच या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यातील संघर्षाची एक छोटीशी झलक आपल्याला टीझरमध्ये दिसते. यासोबतच यो यो हनी सिंगचे संगीतही ऐकायला मिळत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी टीझरचं कौतुक करत आहेत