

raj hanchnale
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेता राज हंचनाळे काही दिवसांपूर्वीच बाबा झालाय. त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. १९ ऑक्टोबर रोजी राजला कन्यारत्न झालं. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. मात्र यावेळेस प्रसूती होत असताना राज लेबर रूममध्ये होता आणि त्याने पत्नीला होणारा त्रास पाहिला. तिची थोडीशी वेदनाही आपण घेऊ शकत नाही याबद्दल त्याने दुःख व्यक्त केलेलं. त्याबद्दल त्याने पोस्टही केलीये. आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सेटवर आपण याबद्दल कुणालाही सांगितलं नव्हतं असं सांगितलंय.