
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एक संस्मरणीय आणि वादग्रस्त लव्हस्टोरी म्हणजे नर्गिस आणि राज कपूर. त्या काळी भारतीय सिनेमातील आघाडीचे दिग्दर्शक आणि निर्माते असलेले राज पहिल्याच भेटीत नर्गिस यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी नर्गिस फक्त 16 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग राज यांनी जसाच्या तसा त्यांच्या एका सिनेमात दाखवला होता.