
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी परदेशात क्रोएशिया येथे गेली होती. तिने तिच्या वाढदिवसाचे काही फोटोही शेअर केलेले. तिने तिच्या कुटुंबासोबत म्हणजेच पती राज कुंद्रा आणि तिची दोन्ही मुले, बहीण शमिता शेट्टी , आई सुनंदा शेट्टी आणि राजचे पालक यांच्यासोबत हा दिवस साजरा केला. मात्र असं असताना अचानक शिल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती एका रेस्ट्रॉरंटमधील मुलीशी भांडतेय असा दावा केला जातोय. मात्र आता त्या घटनेमागची खरी परिस्थिती राज कुंद्रा याने सगळ्यांना सांगितलीये.