
मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे लोकप्रिय अभिनेते राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने एक काळ गाजवला. ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार होते. त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकात त्यांनी कामं केली. मात्र त्यांच्या उमेदीच्या काळानंतर त्यांना फार कठीण काळाला सामोरं जावं लागलं. राजाचा रंक होणं म्हणजे काय हे राजा गोसावी यांची मुलगी शमा देशपांडे यांनी सांगितलं आहे.