

prajakta mali
esakal
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेली कित्येक वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतेय. तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या नृत्याचंही चाहत्यांमध्ये कौतुक होतं. 'फुलवंती' या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. सोबतच तिच्यातील नृत्यकौशल्य पाहून चाहते अवाक झाले. नुकतीच प्राजक्ताने कान्सची वारी केली. तिचा रेड कार्पेटवरचा लूक पाहून सगळेच चकीत झाले. अनेकांनी तिचं कौतुक केलं तर अनेकांनी तिच्यावर टीका केली. मात्र प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास मुळीच डगमगला नाही. आता प्राजक्ताने तिच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेबद्दल सांगितलं आहे.