एकीकडे मराठी भाषेसाठी राजकारण तापलं आहे. तर दुसरीकेड मराठी अभिनेत्रीचं मराठी माणसालाच दुय्यम स्थान देताना पहायला मिळत आहे. 'मराठी माणसांना आधी मेहनत करायला शिकवा' असं एका अभिनेत्रीनं वक्तव्य केलं होतं. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं. तिच्यावर जबर टीका करण्यात आली. त्यानंतर अभिनेत्रीने माफी मागितली आहे.