
राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते. त्यांची लोकप्रियता इतकी होती की आजही त्यांच्याइतकं मोठं स्टारडम कोणत्याही कलाकाराला मिळालेलं नाही. ते त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्यांना राजासारखा आयुष्य जगायला आवडायचं. जेव्हा त्यांच्या करिअरला ब्रेक लागला, त्यांचा वाईट काळ सुरू झाला तेव्हाही त्यांचा राजसी थाट मुळीच सुटला नव्हता. जेव्हा राजेश खन्ना यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या घरात ६४ सुटकेस मिळाया होत्या. राजेश यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात याबद्दल लिहिण्यात आलंय.