
'फॅन्ड्री' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिची आणि जब्याची जोडी प्रेक्षकांची आवडती होती. आजही तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आता पुन्हा एकदा राजेश्वरी सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने गणेश चतुर्थीनिमित्त तिचे बाप्पासोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र त्यावरून आता नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत.