Srikanth Trailer: राजकुमार रावच्या 'श्रीकांत'चा ट्रेलर अखेर आऊट; प्रेक्षकांसाठी ठरणार पर्वणी

Srikanth Trailer: राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत' च्या निर्मात्यांनी बायोपिकचा बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँच केला आहे.
rajkummar rao starer srikanth official trailer released jyotika  marathi entertainment  news
rajkummar rao starer srikanth official trailer released jyotika marathi entertainment news

Srikanth Trailer: राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत' च्या निर्मात्यांनी बायोपिकचा बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँच केला असून प्रेक्षकांना एक अनोखी पर्वणी दिली आहे. हा ट्रेलर श्रीकांत बोल्ला यांच्या प्रवासाची झलक दाखवून जातो ज्याने बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना किती कष्ट करून केली हे यातून दिसून येते. राजकुमारने पूर्वीच्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट भूमिकांद्वारे अमिट छाप सोडली असून त्याने या चित्रपटात देखील दमदार भूमिका साकारली असणार यात शंका नाही.

अलीकडील व्हिडिओमध्ये राजकुमार आणि श्रीकांत बोल्ला एकत्र दिसले होते. या व्हिडिओने सिद्ध केले की हा चित्रपट कसा उत्कृष्ट असणार आहे. 10 मे 2024 रोजी हा चित्रपट थियटरमध्ये रिलीज होणार आहे.

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ मध्ये आलिया एफ, शरद केळकर आणि ज्योतिका यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'श्रीकांत' व्यतिरिक्त राजकुमार रावकडे 'स्त्री 2', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हे चित्रपट पाइपलाइन मध्ये आहेत.

rajkummar rao starer srikanth official trailer released jyotika  marathi entertainment  news
Vishakha Subhedar News : "महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडलं याचा अर्थ...", विशाखाच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com