नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच काही काही अजब वक्तव्य करत असते. अशातच तिने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने भारतीयांकडे एक अजब मागणी केली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत एक अजब मागणी केली आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.