Supreme Court On Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा दणका! चार आठवड्यात सरेंडर करण्याचे दिले निर्देश

Supreme Court On Rakhi Sawant Latest News : आदिल दुर्रानी याने गुन्हा दाखल केल्यानंतर राखीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता.
Rakhi Sawant Leaked Video Controversy Supreme Court refused to grant anticipatory bail Marathi Entertainment News
Rakhi Sawant Leaked Video Controversy Supreme Court refused to grant anticipatory bail Marathi Entertainment News

नवी दिल्ली : पूर्वाश्रमीचा पती आदिल दुर्रानी याचे अश्लिल व्हिडिओ सार्वजनिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत हिला अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुढील चार आठवड्यात आत्मसमर्पण करा, असे निर्देश न्यायालयाने राखीला दिले आहेत.

आदिल दुर्रानी याने गुन्हा दाखल केल्यानंतर राखीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ती दुबईत वास्तव्याला गेली होती. डिसेंबर 2022 मध्ये राखी सावंत हिने दुर्रानीसोबत लग्न झाल्याचा दावा केला होता. या लग्नाला दुर्रानी यानेही दुजोरा दिला होता. याच्या काही दिवसानंतर राखीने आदिलवर हिंसाचार आणि छळवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

Rakhi Sawant Leaked Video Controversy Supreme Court refused to grant anticipatory bail Marathi Entertainment News
Prasad Vedpathak: "अचानक त्यांनी मला 'बायकोजीवी' म्हणायला सुरुवात केली..."; ट्रोलर्सला युट्यूबर प्रसादचं रोखठोक उत्तर

राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यावर आदिल याने राखीवर त्याचे अश्लिल व्हिडिओ लिक केल्याचा आरोप केला होता. दुर्रानी याच्या आरोपानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 34 आणि कलम 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 ए नुसार राखीविरोधात गुन्हे दाखल केले होते. व्हाटस्अप आणि इतर डिजिटल माध्यमांतून आपले अश्लिल व्हिडिओ जारी करण्यात आले असल्याचा दुर्रानी याचा दावा आहे.

Rakhi Sawant Leaked Video Controversy Supreme Court refused to grant anticipatory bail Marathi Entertainment News
Chinmay Mandlekar:"येड्याचा बाजार अन् खुळ्याचा शेजार"; मुलाच्या नावावरुन चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com