
Bollywood Entertainmet News : पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या अटकेमुळे चर्चेत आहे. पुष्पा 2 च्या स्क्रिनींग दरम्यान संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. त्यानंतर सगळ्या इंडस्ट्रीमधून निषेध व्यक्त करण्यात आला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही याबद्दल निषेध व्यक्त केला.