

RAM GOPAL VARMA URMILA MATONDKAR
ESAKAL
राम गोपाल वर्मा हे बॉलिवूडमधील असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी इंडस्ट्रीला एकाच प्रकारच्या चित्रपटांच्या पठडीतून बाहेर काढलं. वर्मा यांनी बॉलीवूडला अनेक हित सिनेमे दिले. 'सत्या', 'रंगीला', 'भूत', 'सरकार' असे अंडरवर्ल्डशी ओळख करून देणारे ते भयपटांची जादू दाखवणारे राम गोपाल वर्मा त्यांच्या वागण्यामुळे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत राहिले. ते अनेकदा वादग्रस्त विधानं करताना दिसतात. त्यांची सगळ्यात जास्त गाजलेली वैयक्तिक गोष्ट म्हणजे त्यांचं आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचं अफेअर. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.