

ram kapoor kiss laila
esakal
'बडे अच्छे लगते हैं' मधून सगळ्यांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता राम कपूर सध्या 'लॉकअप सिझन २' मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळापेक्षा तो त्याच्या वागण्यामुळेच जास्त चर्चेत आहे. २ दिवसांपूर्वीच रामने एक वक्तव्य केलेलं ज्यामुळे त्याचे चाहते देखील त्याच्यावर चिडले होते. मात्र आता त्याने असं काहीतरी केलंय जे पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झालेत. हा खरंच तोच राम कपूर आहे का ज्याला आम्ही ओळखत होतो असे प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत. रामने शोमध्ये चक्क एका मुलाला किस केलंय. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.