

shurpanakha FEES from ramayana
ESAKAL
९०च्या दशकात घराघरात लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे 'रामायण' (Ramayana). रामानंद सागर (Ramananad Sagar)यांच्या 'रामायण'साठी प्रेक्षक हातातलं काम सोडून टीव्हीसमोर बसायचे. ज्याच्या घरी टीव्ही असायचा त्याच्या घरी तर जत्रा जमायची. कुठेकुठे तर मोठ्या पडद्यावर हा कार्यक्रम दाखवला जायचा. यात दिसणारे कलाकार तर आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. दीपिका चिखलीया (dipika chikhaliya) आणि अरुण गोविल (arun govil) यांची लोक पूजा करत असत. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासोबतच या मालिकेतील शूर्पणखादेखील चांगलीच गाजली होती. तेव्हा शूर्पणखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला किती मानधन मिळालेलं ठाऊक आहे का?