

ramayana jatayu scene
esakal
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. चित्रपटातील भव्य दृश्यांपैकी रावण आणि जटायू यांच्यातील युद्धाने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षक या सीनचं कौतुक करत आहेत. चित्रपटात रावणाची भूमिका यशने साकारली असून जटायूला अभिनेते अनुपम खेर यांनी आवाज दिला आहे. सीतामातेचं अपहरण रोखण्यासाठी जटायू रावणाशी प्राणपणाने लढतो. मात्र, या युद्धातील एका दृश्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जटायूला गंभीर जखमी केल्यानंतर रावण त्याचं एक नख स्वतःजवळ ठेवताना दिसतो. त्याने नेमकं असं का केलं असेल असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय.