
रामानंद सागर यांच्या सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'रामायण' ही मालिका. या मालिकेसाठी प्रेक्षक जीवाचं रान करायचे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी चिमुकल्या मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळे प्रेक्षक संध्याकाळचे टीव्हीसमोर बसून आतुरतेने मालिकेची वाट पाहायचे. या मालिकांमुळे संध्याकाळी ७ नंतर रस्ते अगदी सामसूम व्हायचे. आजही प्रेक्षकांना या मालिकेतील कलाकार लक्षात आहेत. मात्र या मालिकेतील एका अभिनेत्याच्या निधनाचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही.