रणबीर कपूरचा 'रामायण' का पाहावा? ही आहेत कारणं

Ramayana Movie Review Ranbir Kapoor Yash Sai Pallavi: सगळेच रामायण चित्रपटाचं कौतुक करत आहेत. मात्र या चित्रपटात असं काय खास आहे.?
ramayana movie review

ramayana movie review

esakal

Updated on: 

स्टार्स- चार स्टार

गेल्या अनेक महिन्यांपासून 'रामायण' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली होती. चित्रपटसृष्टीपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा रंगलेली होती. भारतीय संस्कृतीतील अजरामर महाकाव्य असलेलं रामायण मोठ्या पडद्यावर कशा पद्धतीने साकारलं जाणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल दाटलेले होते. अखेर आता हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. उच्च निर्मितीमूल्ये, कलाकारांची मोठी फौज आणि भव्य-दिव्य व देखणा असा हा चित्रपट आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमधील महत्त्वाकांक्षी असा हा चित्रपट आणि तो अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात सादर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...