

ramayanam box office collection
esakal
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'रामायणम् पार्ट 1' या चित्रपटावर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडला. भगवान श्रीराम यांच्या महाकाव्यावर आधारित या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरात २२१ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी धनत्रयोदशीचा सण असल्याने अनेक जण घरातील कामं आणि खरेदीमध्ये व्यग्र होते. तरीही चित्रपटाच्या शोजना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.