
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे लोकप्रिय दिग्गज अभिनेते रमेश भाटकर यांनी 'माहेरची साडी', 'हमाल दे धमाल', 'सवत माझी लाडकी', 'आई पाहिजे', 'तमाशा' अशा अनेक चित्रपटात काम केलं. त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. मात्र त्यांच्यावर एका अभिनेत्रीने काही गंभीर आरोप केले होते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला होता. इतकंच नाही तर त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवरही त्यांचं नाव लिहिण्यात आलं नाही. असं नेमकं काय घडलेलं?