Ramayana: रामायण सिनेमाच्या सेटवरील फोटो पुन्हा लीक; रणबीर आणि साई पल्लवीचा लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Ramayana: रणबीरचे प्रभू रामांच्या लूक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केली आणि हे फोटो अल्पावधीतच व्हायरल झालेत.
Ramayana
Ramayanaesakal

Ramayana: सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' (Ramayana) या सिनेमाची. रणबीर या सिनेमात प्रभू रामचंद्राची भूमिका साकारतोय आणि तो या सिनेमात काम करत असल्याचं कळल्यापासूनच त्याच्या चाहत्यांमध्ये रणबीर प्रभू रामाच्या लूकमध्ये कसा दिसणार यावर सोशल मीडियावर चर्चा रंगताना पाहायला मिळतेय. नुकतंच एका चॅनेलने रणबीरचे प्रभू रामांच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केली आणि हे फोटो अल्पावधीतच व्हायरल झालेत.

झूम टीव्ही चॅनेलने नुकतचं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रणबीर आणि साई पल्लवीचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ते दोघं सिनेमातील एक सीनचं शूट करत असून त्यांच्या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राजेशाही वस्त्र दोघांनी नेसली असून त्यांचा लूक नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. साई पल्लवी या सिनेमात माता सीतेची भूमिका साकारणार आहे. एका नेटकऱ्यानं या व्हायरल झालेल्या फोटोला कमेंट केली, "दोघांचाही लूक खूप छान आहे" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "या चित्रपटासाठी मी उत्सुक आहे"

सोशल मीडियावर सेटचे फोटो व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत या फोटोचं कौतुक केलं. सिनेमाच्या सेटवर फोन आणण्याची बंदी असतानाही हे फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे आता नितेश तिवारी काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

प्रभू रामांच्या भूमिकेसाठी रणबीर घेतोय मेहनत

रणबीरचा लूक अनेकांना आवडला. या सिनेमासाठी रणबीरने त्याच्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. गेली अनेक वर्षं तो त्याच्या फिटनेसवर काम करतो आहे. तसंच या सिनेमाचं शूटिंग सुरू असेपर्यंत त्याने नॉनव्हेज खाणं आणि धूम्रपान करणं सोडल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

'ही' आहे सिनेमाची कास्ट

काही दिवसांपूर्वी या सिनेमातील इतर कास्टचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. लारा दत्ता, अरुण गोविल यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. अभिनेता आदिनाथ कोठारे भरताच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.या व्यतिरिक्त या सिनेमात आणखी कोण कलाकार असणार हे अजून सिनेमाच्या टीमकडून रिव्हील करण्यात आलं नाहीये.

या सिनेमात रावणाची भूमिका साऊथ स्टार यश साकारणार असल्याची चर्चा आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार यश या भूमिकेसाठी 15 किलो वजन वाढवतोय. या शिवाय तो या सिनेमाची सहनिर्मिती सुद्धा करतो आहे. 2025 या वर्षात हा सिनेमा रिलीज होणार असून नितेश तिवारी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com