

mardaani 3
esakal
राणी मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित " मर्दानी 3 " हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाभोवती फिरते. यशराज फिल्मस्ची निर्मिती असलेल्या अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबरच मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरनंतर खलनायिकेच्या भूमिकेतील मल्लिका प्रसाद यांच्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे. या चित्रपटाची आणखीन एक विशेष बाब म्हणजे मराठमोळी बालकलाकार अवनी जोशी या चित्रपटामध्ये एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत झळकण्याची संधी तिला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली आहे.