
यशराज फिल्म्सची सुपरहिट फ्रेंचायजी ‘मर्दानी’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रेम जिंकत हिंदी सिनेमातील सर्वात मोठी सोलो फीमेल-लीड फ्रेंचायजी ठरली. आज, ‘मर्दानी 2’ च्या रिलीजच्या वर्धापनदिनी, यशराज फिल्म्सने ‘मर्दानी 3’ ची घोषणा केली, ज्यात अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राणी मुखर्जी, या भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक, एकमेव अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे सोलो लीड ब्लॉकबस्टर फ्रेंचायजीचा मान आहे. आता या सिनेमातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालीये.