ranpati shivray changed release date
esakal
Premier
तो वाद अन् 'रणपती शिवराय' चित्रपटाची रिलीज डेट बदलली; 'या' तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सिनेमा
RANPATI SHIVRAY NEW RELEASE DATE: 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची तारीख आता बदलण्यात आलीये. हा सिनेमा ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता.
'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराज अष्टक'मधील पुढील पुष्प असलेला हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. दोन महिन्यांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा झाली होती. मात्र आता प्रदर्शनाला दोन दिवस उरले असताना निर्मात्यांनी या चित्रपटाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रिलीजच्या दोन दिवस आधी या चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. काय आहे 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटाची नवी प्रदर्शनाची तारीख?

