

Dhurandhar Marathi Movie Review
esakal
Marathi Entertainment News : गेले अनेक दिवस बी टाऊनमध्ये चर्चा रंगलेली होती ती 'धुरंधर' या चित्रपटाची. लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी 'उरी... द सर्जिकल स्ट्राईक'मध्ये देशभक्तीपर चित्रपटांवरील आपले दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केले होते. त्यामुळे त्यांच्या या नव्या चित्रपटाबाबत कुतुहल होते. त्यातच रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अर्जन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी अशी कलाकारांची दमदार फळी आणि तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांमध्ये बनलेला हा चित्रपट त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती.