

RAQESH BAPAT
ESAKAL
छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असलेला शो ''बिग बॉस मराठी ' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात अनेक घडामोडी घडल्यात. त्यात कुणाची भांडणं झाली तर कुणी एकमेकांचं मित्र बनलं. या घरात 'नवरी मिळे हिटलरला' मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा एजे म्हणजेच अभिनेता राकेश बापटही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. घरात त्याचं इतर सदस्यांशी चांगलं जमतंय. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दलची चर्चा होताना दिसली. त्यात राकेशने करण सोनावणेला एक महत्वाचा सल्ला दिला. मात्र याच दरम्यान त्याने त्याच्या एक्स पत्नीबद्दलही भाष्य केलं.