

rashmi anpat son
esakal
'अंतरपाट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मी अनपट हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवलीये. रश्मीने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केलंय. नुकताच रश्मीचा मुलगा अबीर आठ वर्षाचा झालाय. त्यानिमित्ताने तिने त्यांचे काही खास फोटो शेअर केलेत. जे पाहून प्रेक्षक चकीत झालेत. तिला आठ वर्षाचा मुलगा आहे हे देखील प्रेक्षकांना पटत नाहीये.