RASHMIKA MANDANNA ON TROLLING
Esakal
RASHMIKA MANDANNA WARRIOR MODE STATEMENT GOES VIRAL: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सध्या चर्चेत आहे. लवकरच तिचा मायसा'हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात रश्मिकाचा एक वेगळा आवतार पहायला मिळणार आहे. दरम्यान अशातच एका मुलाखतीत बोलताना रश्मिकाने सततच्या ट्रोलिंगवर भाष्य केलय. ती सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि टीकेला फारसं महत्त्व देत नाही. मात्र, कुटुंबीयांना ट्रोल करणाऱ्यांना ती जशास तसं उत्तर देण्यास तयार असल्याचं म्हणत तिने ट्रोलर्संना इशारा दिला आहे. यावेळी तिने पती विजय देवरकोंडासोबत झालेल्या ट्रोलिंगचाही उल्लेख केला.