
महाराष्ट्रातील एकेकाळी गजबजलेली एक पडदा चित्रपटगृहे आज अस्तित्वाच्या संकटात सापडली आहेत. मल्टिप्लेक्सचा वाढता प्रभाव, त्यातच ओटीटीसारख्या माध्यमाचे वाढते प्रस्थ आणि शासनाच्या कठोर अटींमुळे राज्यातील अनेक सिंगल थिएटर बंद पडली आहेत. उरलेली आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. परवानग्यांचे नियम, वार्षिक एनओसी, करांचे ओझे आणि पुनर्विकासावरील निर्बंध यामुळे सिंगल स्क्रीन थिएटर मालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.