

ratris khel chale actress
esakal
मराठी असो व हिंदी आता अभिनेत्रींच्या बारीक असण्याला खूप महत्व आहे. अभिनेत्रींच्या दिसण्यावर त्यांचं काम ठरतं. त्यांचा अभिनय नाही तर त्यांचं दिसणं आता महत्वाचं झालंय. वजन जास्त असलेल्या कलाकारांना हिरोईन तर सोडाच पण सहकलाकार म्हणूनही घेताना विचार करतात. त्यामुळे जाड असलेल्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याला अनेकदा बॉडीशेमिंग केलं जातं. त्याची वजनावरून मस्करी केली जाते. अशाच एका अभिनेत्रीला तिच्या कमी वजनामुळे बॉडी शेमिंगचा अनुभव आलेला. 'रात्रीस खेळ चाले' मधील अभिनेत्री अश्विनी मुकादम हिला बारीक असल्याने अनेकांनी हिणवलं होतं.