

MEGHANA JADHAV
ESAKAL
'नटरंग', 'टाईमपास', 'न्यूड', 'बालक पालक' ते 'ताली' अशा अनेक गाजलेल्या चित्रपट आणि सीरिजचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या हिमतीवर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. रवी जाधव यांच्या पत्नी मेघना जाधव या देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. निर्मात्या म्हणून त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स हाताळले आहेत. मात्र रवी आणि मेघना यांच्या आयुष्यातील एक गोष्ट त्यांनी कधीही चाहत्यांसमोर सांगितली नाही ती म्हणजे त्यांच्या मुलाचं आजारपण. एका जीवघेण्या आजारामधून मेघना यांनी त्यांच्या मुलाला कसं बाहेर काढलं याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.