
मराठी सिनेसृष्टीतील अतिशय देखणा अभिनेता म्हणून ज्यांची ओळख होती अनेक प्रेक्षक त्यांच्या एका भेटीसाठी आतुर असायचे असे अभिनेते म्हणजे रवींद्र महाजनी. पिळदार शरीरयष्टी, रेखीव चेहरा, भारदस्त आवाज याच्या जोरावर ते चाहत्यांच्या मनावर राज्य करत. मात्र त्यांचा शेवट अतिशय वाईट झाला. राहत्या घरात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. मृत्यूच्या तीन दिवसांनी त्यांच्या निधनाबद्दल समजलं. मात्र ते त्या घरात एकटेच का राहत होते असा प्रश्न अनेकांना पडलेला. त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याने त्यामागचं कारण सांगितलं होतं.