
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारे लोकप्रिय अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. राजबिंडा, देखणा असा हा पुरुष कित्येकांच्या मनावर राज्य करत होता. त्यांच्या शरीरयष्टी आणि भारदस्त आवाजाचे अनेक चाहते होते. मात्र त्यांचा मृत्यू हा चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेला. कधीकाळी रंजना आणि रवींद्र यांचं अफेअर असल्याचं देखील म्हटलं गेलं. रवींद्र यांची पत्नी माधवी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दलचा उल्लेख केला आहे.