

REKHA
ESAKAL
अभिनेत्री रेखा या कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. त्या अनेक पुरस्कार सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावताना दिसतात. या सर्व कार्यक्रमांना त्या साडी नेसलेल्या असतात. त्यांच्या हटके साडींचीदेखील चाहत्यांमध्ये चर्चा रंगते. मात्र रेखा यांनी स्वतःहून कुणालातरी साडी भेट दिल्याचं फार ऐकिवात नाही. मात्र एका मराठी अभिनेत्रीला रेखा यांनी साडी भेट दिलेली. आणि आजतागायत ११ वर्षांनंतरही त्या अभिनेत्रीने ही साडी नेसलेली नाही. ही अभिनेत्री आहे ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा विविध विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी विशाखा सुभेदार.