

sudhir dalvi
esakal
ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी, ज्यांनी १९७७ च्या 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटात साईबाबांची अविस्मरणीय भूमिका साकारली आणि अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरले, ते सध्या एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. ८६ वर्षाचे असणारे सुधीर दळवी ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर मोठी आर्थिक अडचण उभी राहिली होती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्यांच्या अडचणी दूर झाल्या असून, त्यांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडून ११ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.